Chandrashekhar Bawankule : “दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर…”; बावनकुळेंचे आवाहन
Chandrashekhar Bawankule : 'दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील'

Chandrashekhar Bawankule : यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांनी पिकं पेरलेली होती. पण पाऊस न आल्याने ती पिकं उद्धवस्त झाली. पेरणीत पैसा वाया गेला. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. अनेक नेतेमंडळी सध्या दुष्काळ परिस्थितीची पाहणी करत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत आहे.
याचदरम्यान बावनकुळे आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून कोरोना महामारीपेक्षाही हे संकट मोठे असल्याचे म्हणत महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पुढील आठ महिने पाणी, चारा आणि शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे व नागरिकांनी देखील उत्सवांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यावर भर दिला पाहिजे,” असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपची पाच हजार कार्यकर्त्यांची रॅलीही रद्द करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. “अनेक भागांत पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतकरी व शेतमजूर अडचणीत आहेत. त्यामुळे हार, बुके, बँड यावर खर्च करण्याऐवजी तो पैसा गरजुंच्या मदतीसाठी वापरावा. वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत. दुष्काळी कामांसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची भूमिका घ्यावी. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” अशीही भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली. Chandrashekhar Bawankule
केवायसी किंवा ॲग्रीस्टॅक कार्डाच्या कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे दहा टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्जमाफी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
जनावरे सांभाळणे कठीण
दरम्यान, दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आता त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या पशुधनालाही बसू लागला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने काही शेतकरी नाईलाजाने बैलजोडी, गायी आणि म्हशी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यामुळे बळीराजा देखील मदतीची आशेने वाट पाहत आहेत. Chandrashekhar Bawankule
हेही वाचा:





