देशांतर्गत औषध बाजारपेठेत 11.5 टक्क्यांनी वाढ
Updated On:

देशातील औषधांच्या संघटीत बाजारपेठेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये दोन आकडी वाढ पाहायला मिळाली आहे. एकूण बाजारपेठेत 11.5 टक्के वाढ झाली आहे तर किंमतींमध्ये 5.5 टक्क्यांची वाढ आहे. या आधीच्या सहा तिमाहींमध्ये बाजारपेठ मंदावल्याचे चित्र होते.
दुसरीकडे नियामक संस्थाकडून सिप्ला, लुपिन, बायोकॉन, टोरेन्ट फार्मा, डॉ. रेड्डीज या प्रमुख औषध निर्माण कंपन्यांना इशाऱ्याची पत्रे, उत्पादनविषयक त्रुटी, निरीक्षणे या बाबत सांगण्यात येत असल्याने त्याचा परिणाम कंपन्यांच्या कामावर होत आहे. त्यामुळे अनेक औषध निर्माण कंपन्यांच्या मूल्यात घसरण झाल्याचे दिसते. गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा लुपिनच्या शेअरच्या भावात 20 टक्क्यांची तर सिप्लाच्या भावात 30 आणि बायोकॉनच्या भावात 35 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसत आहे.





