पुणे जिल्हा: एम.फार्मसाठी फडतरे नॉलेज सिटीतील लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीला मान्यता

इंदापूर : कळंब, वालचंदनगर (ता.इंदापूर) ज्ञान,कला,किडा व कृषी प्रतिष्ठान संचलित कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी एम.फार्म या अभ्यासक्रमासाठी फार्मसी कॉन्सील ऑफ इंडिया (पी.सी.आय) या प्राधिकरणाकडून १. फार्मास्युटिक्स २. फार्मास्युटिकल क्वालिटी अॅश्युरन्स ३. फार्माकोलॉजी या तीन शाखेसाठी प्रत्येकी १५ जागाची मान्यता मिळाली आहे.
तसेच पी.सी.आय बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे,जि.रायगड या दोघांच्या तंज्ञ समितीने महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सोयी-सुविधा, लॅबोरेटरी,लायब्ररी व प्राध्यापक यांची सखोल तपासणी करून ही मान्यता दिली गेली आहे.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या या कॉलेजला मिळालेल्या मान्यतेने या परीसरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाह सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधुनिक प्रयोगशाळा, सुसज्य वातानुकुल असे ग्रंथालय, डिजीटल क्लास रूम आणि आध्यापन व संशोधनाची आवड असलेल्या प्राध्यपकासह उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे.
त्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामधील यशस्वी करियर व शास्त्रज्ञ होण्याचे संस्थेचे ध्येय असून बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह, बस व कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे, असे संस्थेचे सचिव, दत्तात्रय फडतरे व संस्थेचे सीईओ जय फडतरे तसेच कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रविण उत्तेकर यांनी सांगितले आहे.





