‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मधून काढला जाणार ‘स्त्री 2’ मधील सीन; दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

Viki Vidya Ka Woh wala video Film | ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ‘स्त्री’ चित्रपटाच्या निर्मात्यांची माफी मागितली आहे. तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. मात्र दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी माफी का मागितली? असा प्रश्न केला जात आहे. याचे उत्तरही त्यांनी दिले आहे.
राज शांडिल्य यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात मॅडॉक फिल्म्सची ‘स्त्री’चे पात्र आणि डायलॉग परवानगीशिवाय वापरल्याबद्दल माफी मागितली आहे. तसेच तो भाग चित्रपटातून काढून टाकण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
राज शांडिल्य यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या सिनेमाचा दिग्दर्शक मी राज शांडिल्य आणि सुपर कॅसेट इंडिया लिमिटेड, बालाजी मोशन पिक्चर्स, वाकाओ फिल्म्स या चित्रपटाचे निर्माते यांच्या वतीने मॅडॉक फिल्म्सच्या फ्रँचायझीचे पात्र आणि परवानगीशिवाय चित्रपटातील संवाद वापरल्याबद्दल मनापासून माफी मागतो. या उल्लंघनामुळे मॅडॉक फिल्म्स आणि त्यांच्या फ्रँचायझींना झालेल्या नुकसानाबद्दल आम्हाला खेद आहे.’
I Raaj Shaandilyaa the director of the film “Vicky Vidya ka Woh Wala Video” on behalf of myself and on behalf of
Super Cassettes Ind. Pvt. Ltd., Balaji Motion Pictures and Wakaoo Films, the producers of the film, extend our sincere and unconditional apology for the unauthorized…— Raaj HINDU Shaandilyaa (@writerraj) October 12, 2024
‘आमच्या चित्रपटातील तो सीन काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. ही प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात असे पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’चा ‘स्त्री २’शी संबंध नाही. तसेच आम्ही ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ किंवा कोणत्याही संबंधित पात्रांमध्ये कोणत्याही अधिकारांचा दावा करत नाही,’ असं राज शांडिल्य यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ यात कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील एका नवविवाहित जोडप्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये नवविवाहित विकी आणि विद्या यांनी त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दाखवण्यात आले होते, ज्याची सीडी कुठेतरी चोरीला गेली.
वर्क फ्रंटवर, राजकुमारचा मागील चित्रपट ‘स्त्री 2’ ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. तृप्ती ‘बॅड न्यूज’मध्ये विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसली होती.





