nagar | शंभर टक्के निकालाची ‘ध्रुव’ परंपरा कायम!

संगमनेर, (प्रतिनिधी) – केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाविन कटारियाने 98 टक्के तर, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या पाखी दातीरने 88 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी दहावीच्या निकालात शाळेतील 30 टक्के मुलांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर 86 टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रथमेश घुले अतिशय खडतर समजल्या जाणार्या जेईई मेन्ससाठी पात्र ठरला आहे.
ध्रुव ग्लोबल स्कूलमधील इयत्ता दहावीच्या भाविन कटारियाने 98 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आयुष सराफ आणि अदिती लाहोटी यांनी प्रत्येकी 97.8 टक्के गुण मिळवत दुसरा, तर पार्थ अट्टल याने 97.6 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय आर्या पाटील (97.40 टक्के), वेदिका रोहोकले (96 टक्के), दीप पडतानी (95.80 टक्के), पलाश करवा (95.40 टक्के), श्रीराज दिघे (95.20 टक्के), ऋषिराज कर्पे (95 टक्के), आयुष काकड, निनाद बरदापूरकर आणि साची पानसंबळ (प्रत्येकी 94.80 टक्के), अद्वैत शिंदे (94.20 टक्के), जय नवले (94 टक्के), श्लोक काळे (93.60 टक्के),
ध्रुव भंडारी (93 टक्के), आर्या कानकाटे (92.40 टक्के), राघव धूत, रजनीश बांगड आणि समृद्धी नाईकवाडी (प्रत्येकी 92.20 टक्के), आदित्य राजूस्कर, ध्रुव पलोड, पार्श कासवा आणि श्रिया मुळे (प्रत्येकी 92 टक्के), ट्विंकल नेहे (91.80 टक्के), अथर्व गाडे (90.60 टक्के), मानस धुमाळ आणि रणवीर शिंदे (प्रत्येकीे 90.40 टक्के) आणि अनन्या वाकचौरे (90.20 टक्के) या विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले.
अदिती लाहोटी, अद्वैत शिंदे, ध्रुव भंडारी, निहार गायकवाड आणि साची पानसंबळ यांनी मराठीत तर, भाविन कटारिया आणि आयुष सराफ यांनी गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळवले. आर्थिक व्यवस्थापन परिचय या विषयात अदिती लाहोटी, वेदिका रोहोकले आणि ध्रुव पलोड यांनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले.
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील पाखी दातीरने 88 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. प्रथमेश घुले 86 टक्के व विवान सांगपाल याने 83.4 टक्के गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. श्रेया दिघे, रुपेश सांगे आणि सिद्धी सोमाणी यांनी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त केले.
बारावी वाणिज्य शाखेतील गरिमा व्यास आणि प्रेम बाफना यांनी प्रत्येकी 92.6 टक्के गुण मिळवत प्रथम, नंदिनी बाहेती आणि अमनमीतसिंग पंजाबी यांनी अनुक्रमे 91.20 टक्के आणि 90.80 टक्के गुणांसह दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला. विश्वतेज गुडेप याने 90.60 टक्के गुणांसह चौथे स्थान मिळवले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





