Brijbhushan Singh : ब्रिजभुषण यांच्यावरील आरोपपत्राबाबत ‘या’ दिवशी होणार निर्णय

नवी दिल्ली – महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायची की नाही, याबाबतचा निर्णय दिल्लीचे न्यायालय येत्या 1 जुलैला घेणार आहे.
अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले आहे. त्या संबंधात कोर्टाने म्हटले आहे की, की हे एक लांबलचक आरोपपत्र आहे त्याचा नीट अभ्यास करून त्यावर निर्णय घ्यायला काही वेळ लागेल.
त्यामुळे पुढील दोन दिवसांत त्यावर विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल आणि पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायची की नाही हे ठरवले जाईल असे कोर्टाने आज नमूद केले. त्यामुळे ब्रिजभुषण यांच्याबाबतचा महत्वाचा फैसला आता 1 जुलै रोजी होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.





