माजी सरपंच अनिल नवले यांची याचिका न्यायालायने फेटाळून निर्मला नवले यांना ठरवले पात्र

रांजणगाव गणपती (वार्ताहर ) : कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांना उच्च न्यायालयाने पात्र ठरवले आहे तर माजी सरपंच अनिल नवले यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.निर्मला शुभम नवले यांची कारेगावच्या सरपंच पदी फेब्रुवारी २०२१ मध्ये निवड करण्यात आली होती. सरकारी गायरान जागेवर अतिक्रमण असल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच अनिल नवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
सदर अपीला मध्ये जिल्हाधिकारी यांनी निर्मला शुभम नवले यांना अपात्र केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाकड़े जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरुद्ध दाद मागितल्या नंतर उच्च न्यायालयामार्फ़त त्यावर स्थगिती दिली होती. त्यानंतर आयुक्त पुणे यांनी निर्मला शुभम नवले यांना पात्र ठरवले होते त्या विरोधात अनिल नवले यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर उच्च न्यायालयामार्फ़त एक ऐतिहासिक असा निर्णय देण्यात आला व निर्मला शुभम नवले यांना उच्च न्यायालयाने पात्र ठरवुन व माजी सरपंच अनिल नवले यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली व निर्मला शुभम नवले यांना पात्र ठरवले. यावेळी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सीनियर कौन्सिल अनिल साखरे व ॲड. रवींद्र पाचुंदकर यांनी निर्मला शुभम नवले यांची बाजू मांडली. या निकालामुळे कारेगावातील ग्रामस्थांनी व सरपंच निर्मला नवले यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त करत आनंद साजरा केला.
हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या कारेगावातील सर्व गायरान गटातील ग्रामस्थांचा व कारेगावकरांचा आहे अशी भावना कारेगावचे सरपंच निर्मला शुभम नवले यांनी व्यक्त केली. विजय नेहमी सत्याचाच होतो. या सर्व घड़मोड़ीमधे निर्मला नवले यांना महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले…..
सरपंच,निर्मला शुभम नवले (कारेगाव)उच्च न्यायालायने माझी याचिका फेटाळून निर्मला शुभम नवले यांना पात्र ठरवले. या निकालामुळे माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वासच उडाला आहे.
माजी सरपंच अनिल नवले (कारेगाव)





