nagar | दाम्पत्यास लाकडी दांडक्याने मारले

राहुरी, (प्रतिनिधी): घराकडे येणारे टाॅयलेटचे पाणी बंद केल्याने आरोपींनी दोघा पती-पत्नीला शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना मालुंजे खुर्द येथे घडली.
नवनाथ धोंडीभाऊ कणसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नवनाथ कणसे यांच्या घराकडे येणारे टाॅयलेटचे पाणी बंद केल्याने आरोपींनी नवनाथ कणसे यांच्या आई -वडिलांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण केली. नवनाथ हे आई-वडिलांना वाचविण्यासाठी गेले असता आरोपी म्हणाले की, तुझा कसा काटा काढायचा, ते पाहतो. छेडछाडीची केस करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत नवनाथ कणसे यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. आरोपी अविनाश आण्णासाहेब कणसे, आण्णासाहेब रंगनाथ कणसे, सुभद्रा आण्णासाहेब कणसे, अविनाश यांची पत्नी ( सर्व रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.





