“देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा, गुहेत जाऊन तपश्चर्या करतात”; संजय राऊतांची मोदींवर टीका

Sanjay Raut On PM Modi| उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंत धार्मिक सत्संग करणाऱ्या स्वयंभू बाबा सूरज पाल उर्फ नारायण साकार हरीचा शोध सुरू आहे. मैनपुरी येथील त्यांच्या आश्रमापासून ते कासगंज येथील घरापर्यंत पोलीस पोहोचले आहे. तर सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणावरुन आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून
संजय राऊत म्हणाले की, “हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत आहेत. बुवा, महाराजांना राजकारणी प्रतिष्ठा देतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या दुर्घटना घडताता. नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली आहेत. देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे. गुहेत जाऊन तपश्चर्या करतात. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांसारखं वागलं पाहिजे. पण तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करता, स्वत:ला बाबा म्हणवता. स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून घेता. तुम्ही हिंदू-मुसलमान करता. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे,” असं म्हणत निशाणा साधला आहे.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले. पण ज्याच्यामुळे गुन्हा घडला त्याच्यावरच कारवाई झालेली नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. 80 हजार लोकांची परवानगी असताना हाथरसमध्ये अडीच लाख लोक कसे जमले?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
“लाडका शेतकरी योजना आणा”
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जातात. तेथील कामाख्या मंदिरात रेडे कापतात. पण यांच्यावर कायद्याने कारवाई करणार कोण, असा सवाल राऊत यांनी विचारला. तसेच लाडकी बहीण योजना आलेली आहे, आता लाडका शेतकरी योजना आणा. रोज दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी अद्याप भाष्य केलेलं नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यावेळी संजय राऊत यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा देखील उल्लेख केला. “या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन अनेक श्रीसेवकांचा जीव गेला होता. याप्रकणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. भर उन्हात त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, छप्पर नव्हते. देशाचे गृहमंत्रीही त्याठिकाणी उपस्थित होते. त्याठिकाणी पळापळ होऊन अनेकांची जीव गेले. यासाठी राज्य सरकावरच कारवाई झाली पाहिजे होती,” असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा:
हाथरस दुर्घटनेतील ‘भोले बाबाने’ आपल्या मृत लेकीवर केला होता ‘चमत्कार’; त्यानंतर झाले असे की…





