स्पर्धा लवकर सुरू व्हाव्यात – मेरिकोम
Updated On:

नवी दिल्ली – करोनाचा धोका संपुष्टात यावा व सर्व क्रीडास्पर्धा लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू सुपरमॉम मेरिकोम हिने व्यक्त केली आहे.
जगभर पसरलेल्या करोनाच्या संकटामुळे केवळ क्रीडाक्षेत्राचीच नव्हे तर सर्वच क्षेत्रांची प्रचंड हानी झाली आहे. ही परिस्थिती आता बदलली जावी. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सगळ्यात क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसलेला आहे. क्रीडाक्षेत्रच असे आहे की ते एकदा सुरु झाले की सकारात्मकता आपोआप येईल, असे मत मेरिने व्यक्त केले आहे.
तिचा मोठा मुलगा प्रिन्स याचा शुक्रवारी वाढदिवस होता. यावेळी स्थानिक पोलिसांनी तिच्या मुलासाठी केक आणला व त्याला शुभेच्छाही दिल्या. पोलिसांनी दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे तिने त्यांचे आभार मानले व त्यांच्या सेवेला सलाम केला.





