\nइंग्लंडच्या वॉननेही घेतली दखल

\n

या पंचाने केलेली कृती जगभरात पोहोचली हीच सोशल मीडियाची ताकद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केवळ सर्वसामान्य व्यक्‍तीच नव्हे तर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही याची दखल घेत खुमासदार प्रतिक्रिया दिली आहे. या पंचाला आयसीसीच्या पंच पॅनेलमध्ये सहभागी करावे, असे गमतीदार मतही वॉनने व्यक्‍त केले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#Video | अतरंगी पंचामुळे स्पर्धा झाली लोकप्रिय, इंग्लंडच्या ‘मायकेल वॉन’नेही घेतली दखल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/news-5.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/news-5.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice#webpage","name":"#Video | अतरंगी पंचामुळे स्पर्धा झाली लोकप्रिय, इंग्लंडच्या ‘मायकेल वॉन’नेही घेतली दखल","url":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/news-5.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-competition-became-popular-due-to-the-intricate-arbitration-englands-michael-vaughan-also-took-notice","name":"#Video | अतरंगी पंचामुळे स्पर्धा झाली लोकप्रिय, इंग्लंडच्या ‘मायकेल वॉन’नेही घेतली दखल"}}]}}}

#Video | अतरंगी पंचामुळे स्पर्धा झाली लोकप्रिय, इंग्लंडच्या ‘मायकेल वॉन’नेही घेतली दखल

Updated On:
#Video | अतरंगी पंचामुळे स्पर्धा झाली लोकप्रिय, इंग्लंडच्या ‘मायकेल वॉन’नेही घेतली दखल

पुणे  – न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेट पंच बिली बाऊडेन यांचे इशारे जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले. सभ्य गृहस्थांच्या खेळात पंचांच्या पारंपरिक इशाऱ्यांना मागे टाकत बाऊडेन यांनी आपली एक खास शैली प्रसिद्ध केली. त्याच बाऊडेन यांचा भारतीय अवतार महाराष्ट्रातील पुरंदरमध्ये एका स्थानिक स्पर्धेतील सामन्यातच पाहायला मिळाला. गोलंदाजानी टाकलेल्या वाइड चेंडूवर कॉल देताना चक्क या पंचाने शीर्षासन करत दोन्ही पाय बाजूला घेत वाइडचा इशारा केला. या पंचामुळेच टेनिस चेंडूवर खेळली जात असलेली ही स्पर्धाही लोकप्रिय झाल्याचे दिसून आले.

पुरंदर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात एका पंचाने ही अगळीवेगळी कृती करत सहकारी पंच, दोन्ही संघातील खेळाडू तसेच उपस्थित प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. काही व्यक्‍तींनी या कृतीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले व त्यावर अनेक गमतीदार प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या असून, काही वेळातच त्याला लाखो हिट्‌स मिळाल्या.

खरेतर क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू वाइड टाकला तर गोलंदाजाच्या बाजूकडील पंच दोन्ही हात पसरवतो व इशारा देतो. या सामन्यात मात्र पंचाने आपल्या पायांचा वापर केला. कॉपीबुक क्रिकेटमध्ये हे मान्य केले जात नसले तरी स्थानिक स्पर्धेत या पंचाने मात्र प्रचंड लोकप्रियता तीदेखील काही वेळातच मिळवली.


इंग्लंडच्या वॉननेही घेतली दखल

या पंचाने केलेली कृती जगभरात पोहोचली हीच सोशल मीडियाची ताकद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केवळ सर्वसामान्य व्यक्‍तीच नव्हे तर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही याची दखल घेत खुमासदार प्रतिक्रिया दिली आहे. या पंचाला आयसीसीच्या पंच पॅनेलमध्ये सहभागी करावे, असे गमतीदार मतही वॉनने व्यक्‍त केले.

आणखी संबंधित बातम्या

"इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स" स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती रेसिंग टीम ची उत्कृष्ट कामगिरी...

2026-01-21 18:26:18

"इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स" स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती रेसिंग टीम ची उत्कृष्ट कामगिरी...

Shirur News : सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेने मिळवले घवघवीत यश

2026-01-01 15:43:08

Shirur News : सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेने मिळवले घवघवीत यश

Bondi Beach Shooting : धक्कादायक! बॉन्डी बीच गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला, ११ हून अधिक ठार

2025-12-14 19:39:50

Bondi Beach Shooting : धक्कादायक! बॉन्डी बीच गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला, ११ हून अधिक ठार

Pune Gramin : माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

2025-08-04 16:02:01

Pune Gramin : माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

IND vs ENG : 'बॅझबॉल सोडा अन्...', भारताचा ऐतिहासिक विजय रोखण्यासाठी वॉनने इंग्लंडला सांगितला फॉर्म्युला

2025-07-06 18:54:25

IND vs ENG : 'बॅझबॉल सोडा अन्...', भारताचा ऐतिहासिक विजय रोखण्यासाठी वॉनने इंग्लंडला सांगितला फॉर्म्युला