पुणे – पर्वती जलकेंद्रातील पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत/पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची काम असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरा नगर परिसर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉकॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा), हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणीचौक परिसर, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरूगणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हाय-वे आणि माळवाडी परिसर, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सुतारवाडी, भूगाव रस्ता, सूस, लष्करभाग, पुणे स्थानक परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, गोंधळेनगर, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, सातववाडी, कळस, धानोरी, विद्यानगर, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर आदी.