Kangana Ranaut: विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्बेटलला पुन्हा सेवेत घेतलं; ‘या’ ठिकाणी केली बदली

Kangana Ranaut। Kulwinder Kaur : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधून निवडून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना रणावत हिला काही दिवसांपूर्वी चंदिगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौर हिच्याकडून कानशिलात लगाविण्यात आली होती. त्यानंतर कुलविंदरला ताब्यात घेण्यात आले आणि निलंबित करण्यात आलं होत. तिच्याविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता.
मात्र, आता सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलविंदर कौरसह तिच्या पतीचीही बदली करण्यात आली आहे. कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानाखाली लगावली होती.
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) June 6, 2024
यानंतर तिच्यावर कारवाई करत निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान आता तिला पुन्हा सेवेत घेण्यात आलं असून आता बंगळुरुला बदली करण्यात आली आहे. कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
कानशिलात लगावणारी कुलविंदर नेमकी कोण ?
कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौरचा विवाह 6 वर्षांपूर्वी जम्मूमध्ये झाला होता. तिचा पतीही सीआयएसएफमध्ये आहे. कुलविंदरला 2 मुले आहेत.
मुलगी 6 ते 7 वर्षांची आणि मुलगा 5 ते 6 वर्षांचा आहे. ती अडीच वर्षे चंदीगडमध्ये तैनात होती. 16 वर्षांपासून ती सेवा देत आहे. तिची यापूर्वी केरळ, चेन्नई आणि अमृतसर येथे पोस्टिंग झाली आहे.





