पुणे जिल्हा | अवसरी बुद्रुक येथील केंद्राचे संचालन महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळले

मंचर, (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथील मतदान केंद्राची पूर्णपणे जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळून यशस्वी केली आहे. मतदान केंद्राला फुग्यांची सजावट आणि सेल्फी पॉईंट मतदारांचे आकर्षण ठरले.
अवसरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेले मतदान केंद्र पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांनी हाताळले असून महिला मतदान केंद्र उभारले असून केंद्रामध्ये सर्व मतदान अधिकारी, शिपाई व पोलिस महिला आहेत. तसेच मतदान केंद्राला सखी मतदान केंद्र, असे नाव दिले आहे, अशी माहिती देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, लोकसभा मतदार संघ अंतर्गत १९६ आंबेगाव विधानसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे बनविण्यात आली होती.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक येथील केंद्र क्रमांक १८४ मध्ये महिला भगिनींनी मतदान केंद्र उभारले असून केंद्रामध्ये प्रवेशद्वाराजवळ आकर्षक अशी कमान उभारली गेली आहे.फुग्याने प्रवेशद्वार सजविले आहे. गुलाबी सुंदर रांगोळी काढण्यात आलेली आहे. संपूर्ण मतदान केंद्र हे गुलाबी या रंगाने सजविले आहे.
तसेच मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक दोन व तीन यांची बैठक व्यवस्थेला देखील सजवले आहे. तसेच महिलांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे करिता सेल्फी पॉईट तयार करण्यात आलेला आहे. मतदान करून लोकशाही बळकट करणे करिता मतदान केंद्रामध्ये स्लोगन लावले असून मतदान केंद्राशेजारी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिला मतदारांचे मतदान केंद्रांवर गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
मतदान केंद्रास स्वीप नोडल अधिकारी सविता माळी, सुनील भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहूल रहाटडे, अभिजीत नाटे, विनायक राऊत, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, काशिनाथ घोंगडे, सचिन तोडकर यांनी मार्गदर्शन केले.
केंद्र गुलाबी रंगाने सजविले…
केंद्रामध्ये प्रवेशद्वाराजवळ आकर्षक अशी कमान उभारली गेली आहे. फुग्याने प्रवेशद्वार सजविले आहे. गुलाबी सुंदर रांगोळी काढण्यात आलेली आहे. संपूर्ण मतदान केंद्र हे गुलाबी या रंगाने सजविले आहे. तसेच मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक दोन व तीन यांची बैठक व्यवस्था देखील सजवली आहे.
तसेच महिलांना मतदान करण्यासाठी आकर्षित करण्याकरिता सेल्फी पॉईट तयार करण्यात आला आहे. त्याचा लाभ अनेक मतदारांनी घेतला. मतदान करून लोकशाही बळकट करणे करिता मतदान केंद्रामध्ये स्लोगन लावले असून मतदान केंद्राशेजारी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिला मतदारांचे मतदान केंद्रांवर गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.





