CNG Cylinder : महागाईची छळ आणखी वाढली.! व्यावसायिक सिलिंडर, सीएनजीच्या दरात वाढ
रविवारपासून लागू झाल्याने सर्वसामान्यांना महागाईची छळ आणखीन सोसावी लागत आहे.

CNG Cylinder : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ केली आहे. तसेच देशात तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतींबरोबरच आयात केलेल्या वायूच्या किमतीही वाढल्या आहेत.
मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो 90 रुपये इतका झाला आहे. ही दरवाढ रविवारपासून लागू झाल्याने सर्वसामान्यांना महागाईची छळ आणखीन सोसावी लागत आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरचे दर जैसे थे ठेवल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमागे १० रुपयांची वाढ होऊन आता त्याची किंमत २,८२० रुपये झाली आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी १९ किलोच्या सिलिंडरमागे ६२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर १ सप्टेंबर रोजी दरात ९.५० रुपयांची वाढ झाली होती.
दुसरीकडे मुंबईत 1 नोव्हेंबरपासून सीएनजीचा दर 90 रुपये प्रति किलो करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे देशांतर्गत उत्पादित गॅस आणि आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे, कारण हे दोन्ही दर आंतरराष्ट्रीय मानकांशी जोडलेले आहेत.





