बापाच्या अपेक्षाचं ओझं बेतलं लेकीच्या जीवावर…; NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याधापक वडिलांकडून मुलीला मारहाण

Sangli Crime News | सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने रागाच्या भरात मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीला जबर मारहाण केली ज्यात तिचा मृत्यू झाला. सांगलीतील आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
धोंडीराम भोसले असे लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापक वडिलांचं नाव आहे. १७ वर्षीय लेकीला नीटच्या सराव-चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांनी याचा जाब लेकीला विचारला. त्यावर पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना? असं उलट उत्तर साधनाने दिल्याने संतापलेल्या बापाने लाकडी खुंट्याने अमानुष मारहाण केली, या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. Sangli Crime News |
मुलगी गंभीर जखमी झाली असतानाही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. शुक्रवारी रात्री मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी धोंडीराम योगा डे साठी सकाळी उठून निघून गेले. साधना घरातच बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला सकाळी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. वडिलांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
दहावीला मिळाले होते ९२ टक्के गुण
मारहाण करणारे वडील स्वत: माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहेत. त्यांची मुलीकडून नीटच्या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची मोठी अपेक्षा होती. पण ती वडिलांची अपेक्षा पूर्ण करू शकली नाही आणि याचीच तिला मोठी शिक्षा मिळाली. साधना अतिशय हुशार मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे. तिला दहावीला ९२ टक्के गुण मिळाले होते. Sangli Crime News |
दरम्यान, लेकीच्या मारहाणीबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली. Sangli Crime News |
हेही वाचा:





