“देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहातून अहंकाराचे मस्तक झुकवले”- राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. सरकारने नव्याने पारित केलेले कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया।
अन्याय के खिलाफ़ ये जीत मुबारक हो!जय हिंद, जय हिंद का किसान!#FarmersProtest https://t.co/enrWm6f3Sq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2021
राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत एक ट्विट केले असून त्यात त्यांनी, “देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाच्या माध्यमातून अहंकाराला झुकवले असल्याचे म्हटले आहे. तसेच अन्यायाच्या विरोधातील विजयावर सर्वांचे अभिनंदन करतो असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपला एक जुना व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सरकार एक दिवस झुकेल असे म्हटले होते.
दरम्यान, पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सुरुवातीला,” आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.





