Prakash Ambedkar : ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल : प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Prakash Ambedkar : धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आह, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी बोलताना हा दावा केला.

Prakash Ambedkar : आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आजचा सुनावणीचा आठवा दिवस असून याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आह, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी बोलताना हा दावा केला.
यासंदर्भात त्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले “मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतरवरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.” असा खळबळजनक दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.
आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा… pic.twitter.com/1HUliWhoi2
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 20, 2026
सुप्रिम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू भक्कमपणे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. त्यांनी गेल्या आठ दिवसांत कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी आमदार अपात्रता, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह याविषयी विविध मुद्दे उपस्थित केले. शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर या निकालाला ठाकरे गटाकडून सर्वेाच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे थोडक्यात
- २१ जून रोजी पक्षात फूट नव्हती. नंतर मागच्या दाराने आमदार गेले. २६ जूनपर्यंत राजकीय पक्ष म्हणून शिंदेंनी दावा केला नाही अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली.
- संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार विधीमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले.
- शिवसेना ठाकरेंचीच असून पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली.
- या मागणीवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? असा प्रश्न ठाकरेंच्या विकलांना विचारला.
ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर आता शिंदे गटाचे वकिल काय बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar Plan Crash: “…तर अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला नसता,” इस्कॉन अध्यक्ष सूरदासजींचे विधान





