Girish Mahajan Atrocity : प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून नाशिकमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याबद्दल वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. या घटनेतील माधवी जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. “मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करा; पण बाबासाहेबांचं नाव संपवण्याचं काम मी होऊ देणार नाही” अशा तीव्र शब्दांत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा घोषणा दिल्या. दरम्यान, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा माधवी जाधव यांना फोन या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य हे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरू शकतो. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, आरएसएस-भाजपाकडून सातत्याने बाबासाहेबांचा अवमान केला जातो, असा आरोप करत गिरीश महाजन यांच्या कृत्याचा जाहीर निषेध केला. वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संताप व्यक्त केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे दिलगिरी गिरीश महाजनांची दिलगिरी दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना, भाषणात अनावधानाने बाबासाहेबांचं नाव राहिलं, त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता, असं सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे. हेही वाचा : Girish Mahajan : महिला कर्मचाऱ्याच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांची दिलगिरी; काय म्हणाले पहा.. Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान वाद; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने सरकारी महिला कर्मचारीने विचारला जाब