पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वडगाव पुलाजवळील ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. शहरातील दुसरी घटना घडल्यामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. सिंहगड रोडवरील कॅनलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, हा मृतदेह अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडलेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहाची अवस्था गंभीर विघटन झालेली असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. घटनास्थळी पुणे पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असून, पंचनामा व तपासकार्य सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे कारण व नेमकी घटना कशी घडली याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसऱ्या घटनेत वडगाव ब्रिज शेजारील ओढ्यात आढळलेल्या मृत व्यक्तीचे वय 50 च्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेस्ट टीम्स दाखल झाली असून अधिक तपास सुरु आहे