केरळमध्ये शर्यतीदरम्यान बोट उलटली
Updated On:

कन्नूर – उत्तर केरळ जिल्ह्यातील मुझाप्पिलंगड येथील धर्मडोम येथे शनिवारी शर्यतीदरम्यान 20 जणांसह एक बोट उलटली. परंतु भारतीय नौदलाच्या गोताखोरांनी केलेल्या जलद कारवाईमुळे सर्वांना वाचविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात चॅम्पियन्स बोट लीग-23 शर्यतीदरम्यान घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मडो येथील मुझप्पिलंगगड येथे “चॅम्पियन्स बोट लीग-23′ ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीदरम्यान एक बोट अचानक उलटली. या बोटीत एकूण 20 जण होते, ज्यात काही जणांना पोहताही येत नव्हते.
याप्रसंगी सुरक्षा उपायांवर देखरेख ठेवण्यासाठी तैनात असलेल्या दक्षिण नौदल कमांडच्या डायव्हिंग टीमने तातडीने बचावासाठी धाव घेत सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढत किनाऱ्यावर आणले.





