सर्वोत्तम ऑफस्पिनर अश्विनच – हरभजन
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक क्रिकेटमध्ये आजच्या घडीला अनेक फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. भारतासह सर्वच देशांकडे असे अव्वल गोलंदाज आहेत, पण भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनच सर्वोत्तम आहे, असे मत वरिष्ठ ऑफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे.
भारतातच नव्हे तर परदेशातही अश्विनने आपल्या फिंगर स्पीनने अनेक दिग्गज फलंदाजांवर सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. चेंडूला फ्लाइट देण्याची त्याची क्षमता, कॅरम बॉल यांमुळे अश्विन सर्वात भेदक फिरकी गोलंदाज ठरतो.





