नवरात्रीच्या रंगात खुलले मराठी तारकांचे सौंदर्य

मुंबई – काल पासून सर्वत्र नवरात्रीचा प्रारंभ झाला असून, नवरात्री अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस. अतिशय पवित्र अशा या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली असून जागोजागी गरबा आणि दांडियाची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या मंगलमय सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारही मागे राहिले नसून त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तारकांनी या नऊ दिवसांमधील ठराविक रंगांमधील आपले लुक आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.





