“दादांच्या नावाचा पुरस्कार, मला लयं भारी वाटतयं”; सूरज चव्हाणचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मान

Suraj Chavan Dada Kondke Award : ‘बिग बॅास’ मराठी या रियालिटी शोमुळे महाराष्ट्राच्या घराघरात सूरज चव्हाण हे नाव पोहचलं. या रियालिटी शोमुळे सूरजला मोठी प्रसिद्धी मिळाली. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्यासोबत ‘झापुक झपुक’ हा चित्रपट बनवला. आता सूरजच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे. सूरज चव्हाणला स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सूरजची बिग बॅासमधील सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर उपस्थित होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. सूरजने स्वतः याबाबत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करीत माहिती दिली. तुमच्या अख्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला , लय भारी वाटतंय असंच प्रेम राहू द्य, असे कॅप्शन व्हडिओच्या खाली सूरजने दिले आहे. त्याला हा पुरस्कार मिळाल्याने त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.
व्हायरल व्हडिओमुळे संभ्रम
नुकताच काही दिवसांपूर्वी सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमुळे त्याचा साखरपुडा ठरला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण या व्हिडिओच्या शेवटी सूरज स्वप्न पाहत असल्याचे दिसले होते. म्हणजेच त्याचा साखरपुडा ठरला नव्हता, तर असाच एक रिल तयार करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
View this post on Instagram
….म्हणून महाराष्ट्राच सूरजवर प्रेम
महाराष्ट्राने सूरज चव्हाणवर भरभरून प्रेम केले. सुरुवातीच्या काळात त्याला टिकटॅाकवरील व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळाली. या माध्यमाचा वापर करून त्याने पैसही कमावले. मात्र, त्याच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा अनेकांनी त्यावेळी गैरफायदा घेतला. त्याला अनेकांनी फसवलं. त्यानंतर अचानक टिकटॅाक भारतातून बॅन करण्यात आले. यानंतर त्याची क्रेझ कमी झाली. मात्र, इन्स्टाग्राम या माध्यमाचा वापर करून त्याने रिल तयार करून पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवली. त्यानंतर सूरज चव्हाण थेट बिग बॅास या रियालिटी शोमध्ये एन्ट्री दाखल झाला आणि संबंध महाराष्ट्राचं प्रेम त्याला मिळवलं. या प्रेमामुळे तो बिग बॅासचा विजेता झाला.
हेही वाचा: जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट एटनाचा अचानक उद्रेक ; जीव मुठीत घेऊन पळाले पर्यटक, पहा video





