राज्यातील वातावरण अगदी चुकीचे ; अशोक चव्हाण यांनी केली टीका

नांदेड – देशाच्या प्रगतीत आणि विकासात सगळ्यांचा हातभार लागला पाहीजे पण सध्या देशात एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम चालू असल्याची टीका कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. लोकशाहीत राजकीय विरोध असायला पाहीजे पण राज्यात जे वातावरण सध्या बनले आहे ते चुकीचे आहे. याला संपवा, त्याला संपवा हे महाराष्ट्रात चालणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
देशात सध्या चालू असलेल्या कारवायांवरून चव्हाण यांनी केंद्र सरकार विरोधकांना त्रास देत असल्याची टीका केली आहे. चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांचा आधार घेत ही टीका केली आहे. समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमध्ये पार पडला.
यावेळी चव्हाण यांनी बसवेश्वरांच्या विचारांची गरज असल्याच मत व्यक्त केले आहे. बाराव्या शतकात लोकशाहीची मुल्य रूजवण्याचे काम बसवेश्वरांनी केल्याचे चव्हाण म्हणाले आहेत. बसवेश्वरांच्या विचारांचा आधार घेत चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे.





