कार्तिकी गायकवाडच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन !

Kartiki Gaikwad| ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. लग्नानंतर चार वर्षांनी गायिकेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कार्तिक गायकवाड आणि रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कार्तिकीने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
कार्तिकीने 2020 मध्ये रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई झाली आहे. याबाबत कार्तिकीने पोस्ट शेअर करत लिहिते, “इट्स अ बॉय…माझ्या गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.” कार्तिकीने सोशल मीडियावर बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टनंतर तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Kartiki Gaikwad|
View this post on Instagram
मार्च महिन्यात कार्तिकीने ती आई होणार असल्याचे जाहीर केलं होतं. डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने खास लूक केला होता. हिरव्या रंगाच्या साडीवर तिने हलव्याचे दागिने परिधान केले होते. तिच्या या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. Kartiki Gaikwad|
दरम्यान, गायिका कार्तिकी गायकवाड ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. या शोमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा:





