Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

इस्लामाबाद – पाकिस्तानात दहशतवाद्याच्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय परिषद पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. देशात अलिकडच्या काळात वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद बोलावण्यात आली होती.
ही परिषद 7 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही बैठक 9 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ही परिषद पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
तुर्कीतील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेहबाझ शरीफ तुर्कीला जाणार असल्यामुळे ही परिषद पुढे ढकलण्यात आली आहे, असे समजते आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/norway-looks-to-donate-7-3-billion-in-aid-to-ukraine/
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पेसावरमदील मशिदीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा कट अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला होता, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 200 जण ठार झाले होते आणि त्यात बहुसंख्य पोलीस आणि सैनिक होते.





