चेन्नई – तामिळनाडूतील अद्रमुक (AIADMK) पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोमिलन होईल असे संकेत शशिकला यांनी दिले आहेत. शशिकला या अद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
आज चेन्नई येथे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, पुढील सार्वत्रिक निवडणुकांना आमच्या पक्षाचे दोन्ही गट एकत्रित सामोरे जातील आणि विजय मिळवतील. चेन्नई येथील किलपॉक चर्चमध्ये त्यांच्या हस्ते वृद्धांना मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्यांनी मध्यंतरी राजकारण संन्यास घेतला होता. तथापि, आता त्या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे चिन्हे आहेत. त्याच हेतूने त्यांनी अद्रमुक पक्षाच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
Terror Funding Case : चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये NIA चे अनेक ठिकाणी छापे
परंतु त्यांच्या या प्रयत्नांचे एकाही गटाने जाहीरपणे स्वागत केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येईल, याची शंकाच आहे.