Indapur : कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात कृषी विभागाची अनास्था
Indapur : या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शास्त्रज्ञ अक्षय वाघमोडे यांनी डाळिंब बहार तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि दुष्काळी परिस्थितीत पाणी नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.

निमगाव केतकी : कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 17 नोव्हेंबर रोजी निमगाव केतकी येथे ‘खेत बचाव अभियान’ राबविण्यात आले. मात्र, गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजनातील त्रुटींमुळे या महत्त्वाच्या उपक्रमाला अवघे 16 शेतकरी उपस्थित राहिले. कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात कृषी विभागाच्या कार्यक्रमाला शेतकर्यांची अल्प उपस्थिती राहिल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शास्त्रज्ञ अक्षय वाघमोडे यांनी डाळिंब बहार तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि दुष्काळी परिस्थितीत पाणी नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. मात्र, अपुर्या नियोजनामुळे या मार्गदर्शनाचा लाभ बहुतांश शेतकर्यांना मिळू शकला नाही.
कार्यक्रमातील शेतकर्यांची कमी उपस्थिती आणि नियोजनाबाबत विचारणा केली असता, लोक कामात आहेत, जत्रा आहे म्हणून आले नाहीत, असे उत्तर सहाय्यक कृषी अधिकारी वर्षा बोराटे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. अधिकार्यांकडून अशी उत्तरे मिळत असतील, तर शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने कोण पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
कृषी विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन नियोजनातील त्रुटींसाठी जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी. शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या योजना केवळ कागदावर न ठेवता त्यांची माहिती आणि लाभ प्रत्यक्ष तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.





