मुंबई – गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी हे दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहेत. दोघेही ‘सूर्यपुत्र कर्ण’मध्ये ‘कर्ण’ आणि ‘द्रौपदी’च्या भूमिकेत दिसल्यापासून या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि सना खाननंतर आता गौतम रोडेची पत्नी पंखुरी अवस्थी जुळ्या मुलांची आई झाली आहे.
4 फेब्रुवारी 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. आता लग्नाच्या पाच वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. पंखुरी अवस्थीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या जुळ्या मुलांच्या जन्माची बातमी देत एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी पंखुरी म्हणाली,’आम्हाला एक मुलगा आणि मुलगी झाली आहे. आमच्या कुटुंबातील नवीन सदस्याला तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे. ‘गौतम-पंखुरी’
टीव्हीची लोकप्रिय सून दिव्यांका त्रिपाठीपासून ते लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगपर्यंत अनेकांनी गौतम-पंखुरीला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉसची स्पर्धक देवोलीना भट्टाचार्यने लिहिले, “अभिनंदन गौतम-पंखुरी”, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानने देखील या कपलचे अभिनंदन केले,
View this post on Instagram
गौतम-पंखुरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर गौतमने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याला ‘महाकुंभ एक रहस्य’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ मधून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तो चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दिसला आहे. पंखुरीबद्दल बोलायचे तर ती ‘ये है आशिकी’, ‘रजिया सुलतान’, ‘कौन है?’, ‘लाल इश्क’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मॅडम सर’, ‘गुड से मोठा इश्क’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.