Jodhaa Akbar Special Screening | बॉलीवुड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी ‘जोधा अकबर’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. 2008 मध्ये आलेल्या या पीरियड ड्रामाला चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. 17 वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या चित्रपटाबाबत ऑस्करने खास घोषणा केली आहे. ‘जोधा अकबर’ हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2008 ला रिलीज झाला होता. नुकतेच या चित्रपटाने 17 वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आजही हा चित्रपट आवडीने पाहायला जातो. या चित्रपटात हृतिकने मुगल सम्राट अकबरची, तर ऐश्वर्या रायने जोधाबाईची भूमिका साकारली होती. भव्यदिव्य सेट, अप्रतिम सिनेमेटोग्राफी, कॉस्ट्यूमसाठी या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरली होती. आता ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा केली आहे. आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या “जोधा अकबर” सिनेमाचे मार्च महिन्यात स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. मार्च 2025 मध्ये लॉस एंजेलिस येथे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडेल. या चित्रपटाचं या चित्रपटाचे बजेट सुमारे 40 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली होती. चित्रपटाला 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘जोधा अकबरला 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी प्रेक्षकांचा खूप आभारी आहे. लोकांनी हा चित्रपट त्यांच्या आठवणीत ठेवला व प्रेम व्यक्त केले. चित्रपटाच्या रिलीजपासून ते ऑस्करमध्ये त्याची स्पेशल स्क्रीनिंगपर्यंत, यामध्ये सहभागी सर्व लोकांच्या कामामुळेच हा चित्रपट यशस्वी होऊ शकला.’