Actress Prajakta Mali : मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिच्याकडे पाहिलं जातं. तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केलं आहे. अभिनेत्रीला डान्सची खूप आवडं असून तिने तिचे डान्स करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली आहे. तिच्या चाहत्यांना तिने ही यात्रा का केली असा प्रश्न पडला होता. अखेर अभिनेत्रीने ही यात्रा करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तिने व्हिडीओ शेअर करत याबाबत सांगितलं आहे. तसेच या व्हिडीओत तिला १२ ज्योतिर्लिंगापैकी कोणतं ज्योतिर्लिंग आवडलं याबाबतही तिने सांगितलं आहे. सगळ्याचं ज्योतिर्लिंगाना तितकेचं महत्त्व आहे. ती सगळी शक्तीस्थळे आहेत. खूप पॉवरफुल आहे. एखादे आपले आवडते असते. तर माझं आ़वडतं ठिकाण आहे उज्जैन महाकाल! असं तिने सांगितलं आहे. काय म्हणाली प्राजक्ता? मी बालपणापासून भरतनाट्यम शिकते आहे. त्यात देवांवर आधारित इतक्या रचना नाचते आहेत. त्यातील ७५ टक्के रचना या भगवान शिवांवर आधारित होत्या. नृत्याची देवता नटराज म्हणजेच शिवा. मला जे अध्यात्मिक गुरू मिळाले त्यांचं नावही रवीशंकर आहे. अशा अनेक गोष्टींमुळे ते डोक्यात होते. त्यामुळे मलाही माहिती नव्हते की हे करायचं आहे. देवाने माझ्याकडून ही गोष्ट घडवून घेतलीय, असं प्राजक्ताने सांगितलं. सगळ्याच ज्योतिर्लिंगांना तितकेच महत्त्व आहे. ती सगळी शक्तीस्थळे आहेत. खूप पॉवरफुल आहे. एखादे आपले आवडते असते. माझे आ़वडते ठिकाण आहे उज्जैन महाकाल. बारा ज्योर्तिलिंग आहेत तशा बारा राशी देखील आहेत. माझ्या राशीनुसार, माझं ज्योर्तिलिंग महाकाल आहे. सर्वात अवघड ज्योतिर्लिंग केदारनाथ असल्याचं ती म्हणाली. येथे जाण्यासाठी तुम्हाला पायी ट्रेक करावा लागतो, खेचर घ्यावा लागतो किंवा पालखी घ्यावी लागते. तरीही तुम्हाला खूप त्रास होतोच. हेही वाचा : Girish Mahajan : भाजपचा कार्यकर्ता खडसेंच्या फोटोवर थुंकला; गिरीश महाजनांची नाराजी; रक्षा खडसेंची हळहळ