ठरलं ! पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 4 मार्चपासून होणार सुरू

Updated On:

पुणे : पुणेकरांसह जगभरातील सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख आज जाहीर करण्यात आहे. येत्या ४ मार्च पासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे यंदा 19 वे वर्ष असून, कोरोना काळात अग्रस्थानी असलेल्या फ्रंटलाईन वॉरियर्सला हा महोत्सव समर्पित असेल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी जानेवारीमध्ये महोत्सव यंदा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला असल्याचेही पटेल यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ४ मार्च ते ११ मार्च दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

इफफीच्या धर्तीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही माध्यमातून चित्रपट दाखवण्यात येणार आहे. जवळपास ९० देशांच्या आणि भारतीय सर्व भाषांमधील तब्ब्ल 180 चित्रपट सादर केले जाणार असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष असून चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षी महोत्सव सिनेरसिकापर्यंत पोहोचणार आहे.

पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला व दरवर्षी चित्रपट रसिक ज्याची आतुरतेने वाट पहात असतात अशा या महोत्सवासाठी यावर्षी ९३ देशांमधून तब्बल १६११ चित्रपट प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी विविध विभागातील तब्बल १८० चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना महोत्सवा दरम्यान घेता येणार आहे. चित्रपट निवड समितीच्या माध्यमातून या चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मागील २०२० हे वर्ष आपल्या सर्वासाठी एक प्रकारची अनिश्चितता, भीती आणि अर्थात संघर्षाचे होते. मात्र आता एक आशा घेऊन आपण सर्वांनीच २०२१ मध्ये पाऊल टाकले आहे. सोबतच या परिस्थितीत अग्रस्थानी कार्यरत असलेल्या ‘कोविड वॉरियर्स’च्या कष्टाचे चीज होऊन, सर्वत्र लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात येत पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे आता, सिनेरसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान असलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहोत.

चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षीचा महोत्सव होणार असून कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महोत्सवावेळी असणा-या सर्व सरकारी नियमांचे पालन करीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोविड काळात अग्रस्थानी असलेल्या ‘फ्रंटलाईन वॉरियर्स ला आम्ही यावर्षी हा महोत्सव समर्पित करीत आहोत.”

आणखी संबंधित बातम्या

Top 10 News : देशावर दुहेरी संकट ते कोस्टल रोडवर भीषण अपघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-09-20 18:50:03

Top 10 News : देशावर दुहेरी संकट ते कोस्टल रोडवर भीषण अपघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Pune News : बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

2026-09-18 13:33:16

Pune News : बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन

2026-09-15 15:42:59

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन

Ganeshotsav 2026 : 21 हजार पाणीपुरींच्या पुऱ्यांतून साकारला 13 फूट उंच गणपती; पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

2026-09-14 22:16:26

Ganeshotsav 2026 : 21 हजार पाणीपुरींच्या पुऱ्यांतून साकारला 13 फूट उंच गणपती; पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Pune Accident : उंड्री चौकात काळाचा घाला! ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू

2026-09-14 22:06:45

Pune Accident : उंड्री चौकात काळाचा घाला! ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू