“त्या’ झोमॅटो गर्लला अखेर अटक

नवी मुंबई – वाशी येथे पोलिसांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ही मुलगी वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसते आहे. हा व्हिडिओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहचला आणि त्यानंतर या मुलीला अटक करण्यात आली आहे. प्रियंका मोगरे असे या झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलीचे नाव आहे. प्रियंका वरळी येथे वास्तव्यास आहे.

8 ऑगस्ट रोजी ती नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी सेक्‍टर नऊमध्ये गेली असता प्रियंकाने तिची गाडी चुकीच्या ठिकाणी उभी केली होती. त्यानंतर मोहन सलगर यांनी कारवाई करण्याच्या हेतूने या वाहनाचा फोटो काढला. या फोटोत वाहनाच्या बाजूला प्रियंकाही उभी होती. त्यामुळे तुम्ही माझाच फोटो का काढलात? असे तावातावाने विचारत प्रियंकाने पोलिसांना आणि तिथे असलेल्या महिला पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे सुरू केले.

वाहन अडवता आले नाही तर फोटो काढल्यास त्या वाहनाच्या क्रमांकावरुन संबंधित शिस्त मोडणाऱ्या व्यक्‍तीचे सगळे तपशील मिळतात आणि घरी दंडाची पावती पाठवली जाते. याच पद्धतीचा अवलंब सलगर यांनी केला होता. मात्र त्या फोटोबाबत पूर्ण माहिती न घेता आणि काहीही ऐकून न घेता प्रियंकाने सलगर आणि इतर कर्मचाऱ्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. यासंदर्भातला व्हिडिओ टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या एका कामगाराने त्याच्या मोबाईलमध्ये काढला आणि व्हायरल केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)