‘तो’ व्हिडीओ ठरला गोळीबार हल्लाचं कारण; मोठी माहिती समोर! असं काय म्हणाली होती खुशबू पटानी?

Disha Patani House Firing : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशमधील बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आली आहे. या हल्ल्याच्या जबाबदारी जबाबदारी रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर त्यांनी गोळीबाराची जबादारी स्विकारली असल्याचं म्हटलं आहे. पण आता नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला असा प्रश्न विचारला जात असाताना याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर दिशा पटानी हिच्या घराबाहेर पालीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आधात्मिक गुरू आणि धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ दिशा पटानीची बहिण खुशबू हिने पोस्ट केला होता. त्याचं झालं असं होतं की अनिरुद्धचार्य महाराज यांनी लिव्हइन रिलेशनशिपबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर व्हिडीओच्या माध्यमातून खुशबू हिने संताप व्यक्त केला होता. या व्हिडीओमुळे त्यांच्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
काय म्हणाली होती खुशबू पटानी?
मुलं 25 वर्षांच्या मुलींना घेऊन येतात, ज्यांना आधी 4-5 ठिकाणी तोंड मारलेलं असतं, असं अनिरुद्धचार्य म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर खुशबू पटानी हिने संताप व्यक्त करत बाबा माझ्या समोर असते तर, मी सांगितलं असतं तोंड मारणं काय असतं ते… बाबा राष्ट्र विरोधी आहे… तुम्ही अशा बदमाशांना पाठिंबा देऊ नये. या समाजातील सर्व नपुंसक लोक त्याचं अनुसरण करतात, असं ती म्हणाली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं काही पाप आहे का? असा सवालही खुशबू पटानी हिने उपस्थित केला होता. तिच्या या विधानावरून गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
पोस्टमधून थेट धमकी
गोळीबाराच्या घटनेनंतर हिंदीमध्ये लिहिलेली एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमध्ये खुशबू हिने पूज्य संतांचा अपमान केला आहे. तिने सनातन धर्माचा अपमान केला आहे… आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही, अशी थेट धमकी पोस्टमधून देण्यात आली आहे.
हेही वाचा : ब्रेकनंतर पुन्हा राज्यात पावसाची एन्ट्री; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता





