Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तृतीयपंथीची पोलिसांत धाव; कोणावर केली FIR दाखल?
Narhari Zirwal : सदर व्हिडिओ मूळ स्वरुपातील नसून तो एडिट करत त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

Narhari Zirwal : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतच्या कथित व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली.
याप्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओत मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या भावाविरोधात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृतीयपंथीयाने पोलिसात धाव घेत आपल्या भावाने आधी ब्लॅकमेलिंग करत नंतर व्हिडिओमध्ये छेडछाड करत तो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. Narhari Zirwal
सदर व्हिडिओ मूळ स्वरुपातील नसून तो एडिट करत त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे व धमकावणे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ व ३५१(१) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Narhari Zirwal
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला. जो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. Narhari Zirwal
त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी आपल्याकडे केली. त्यानुसार त्या व्हिडीओची शाहनिशा करुन, सत्यता तपासली जाईल आणि मग निर्णय घेऊ,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा:






