‘…तो साप माझा ड्रायव्हर होता”; राम गोपाल वर्मा यांचा सलमानला टोला, करून दिली ‘हिट-अँड-रन’ची आठवण

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खानला 26 डिसेंबर 2021 रोजी सापानं दंश केला. पनवेलच्या फार्महाऊस मध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. सलमान खान ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल येथील आपल्या फार्महाऊस वर गेला होता आणि याच दरम्यान त्याला सर्प दंश झाला.
मात्र, यानंतर त्याला मध्यरात्री 3 .30 वाजता तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये सलमान दाखल होता. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर आता फिल्ममेकर राम गोपाल यांनी एक एक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली असून, सध्या त्यांची ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘या पोस्टमध्ये त्यांनी एक साप आरोपीच्या पिंजऱ्यात असून तो बोलतो की ज्या सापाने सलमानला सर्पदंश केला, तो मी नाही तर माझा ड्रायव्हर होता.’ या आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली आहे. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांनी सुध्या या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 29, 2021
दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून नेटकऱ्यांनी हिट-अँड-रन प्रकरणाची आठवण करून देणार आहे. ज्यामध्ये सलमानच्या गाडीचा अपघात झाला होता. २७ सप्टेंबर 2002 रोजी रात्री घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले होते. नंतर डिसेंबर 2015 मध्ये सलमानने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले होते की त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता. हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला.





