Asrani’s last post : देशभरात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात असताना बॅालिवूड इंडस्ट्रीवर मात्र शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे काल वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. क्लासिक फिल्म शोलेमधील “हम अंग्रेजो के जमाने के जेलर है” हा असरानी यांचा डायलॅाग जगप्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या सहज सुंदर आणि अचुक टायमिंगच्या जोरावर प्रसिद्ध मिळवली. मात्र, अभिनेत्याची निधनाची बातमी येण्याअगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये असरानी नेमकं काय म्हणाले होते? असरानी यांनी इंन्स्टाग्राम अकाऊंटरून दिवाळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेवटची पोस्ट ठरली आहे. २० अॅाक्टोबरला मुंबईतील जुहू या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य निधी रुग्णालयात त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. असरानी यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सोमवारी दुपारी दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमधून त्यांनी एक फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा देत हॅप्पी दिवाळी असे म्हटले होते. त्यानंतर काही तासांनंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. मीडिया रिपोर्टनुसार, असरानी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुसांचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आल्याची शक्यता आहे. ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी झाला. १९६० च्या दशकात त्यांनी अभिनय करण्यास सुरूवात केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल ३५० हून अधिक सिनेमे केले आहेत. ते त्यांच्या अचूनक टायमिंगसाठी ओळखले जायचे. ‘शोले’, ‘भूल भुलैया’, ‘धमाल’, ‘बंटी और बबली 2’ या आणि अशा कित्येक सिनेमांतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांवर जादू करणारा ठरला. हेही वाचा : Mahabaleshwar Municipality : महाबळेश्वर पालिका निवडणूक शिवसेना लढणार; नगराध्यपदासाठी कुमार शिंदे यांना उमेदवारी