तो एक मेसेज अन् अंकिता कुणालचं जुळलं; कोकण हार्टेड गर्लने सांगितली ‘लव्हस्टोरी’ची सुरुवात

Ankita Walawalkar | Kunal Bhagat | नुकतीच मराठी बिग बॅास फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने कुणाल भगत ह्याच्यासोबत लग्नीनगाठ बांधली. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. कुणाल आणि अंकिताची पहिली भेट एका अॅवार्ड कार्यक्रमावेळी झाली असल्याचे अंकिताने अनेक मुलाखती दरम्यान सांगितले आहे. त्यानंतर दोघेही रिलेशनमध्ये आली आणि त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात अंकिता आणि कुणालचं लग्नसोहळा पार पडला. गुढीपाढव्याच्या मुलाखती दरम्यान दोघांच्या लव्हस्टोरीचा उलघडा कुठून झाला याविषयी खुलासा केला आहे.
लग्नाच्या आधी दोघांनीही केलेले फोटोशूट केले होते, त्यांच्या चाहत्यांना हे फोटोशून प्रचंड आवडले. अनेकानी दोघांची जोडी गोड दिसत असल्याने कौतुक केले. त्यानंतर दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. अनेकांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या मुलाखतीवेळी कुणालाने सुरुवातीला बोलण्यास केली असल्याचे त्याने स्वतः स्पष्ट केले. अंकिताला इन्स्टाग्रामवरुन पहिला मेसेची मीच पाठवला असल्याचे त्याने सांगितले. तर अंकिताने कुणालचे कौतुक करीत तो खरंच पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी बोलत असल्याचा खुलासा केला.
…त्यानंतर बोलण्याला सुरुवात झाली
मी सातत्याने तिला मेसेज करतच होतो. पण तिला दिवसाला खूप मेसेज येत राहतात. माझा मेसेज अंकिताने दोन-तीन महिन्यानंतर पाहिला असेल, असे कुणालने सांगितले. मी तिला छान काम करते असा मेसेज केला होता. मला तिचं मालवणी बोलणं आणि तिचे रिल्स फार आवडले होते. त्याच्यानंतर आमची भेट अवॉर्ड फंक्शनला निमित्ताने झाली. तिथे आम्ही एकेमकांना त्यानंतर खरं बोलणं सुरु झालं.
तो कधीच मला आय लव्हू म्हणाला नाही
त्याने आपण एक दिवस भेटूयात असे तो म्हणाला होता. त्यानंतर मी त्याला नॅार्मल भेटायला गेले होते. त्याने मला अचानक विचारलं तू मला आवडतेस मला लग्न करायचं आहे. त्यावेळी मी त्याला नाहीच म्हटले होते, असं अंकिता म्हणाली. कुणालचं कौतुक करत ती पुढे म्हणाली तो खरंच पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी बोलत असतो. त्याने माझे लग्न न करण्याचे नकारात्मक पॉईंट्स बाजूला केले. त्याने कधीच मला आय लव्ह यू म्हटलं नाही. त्यानं मला सांगितलं की, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, अशी आठवण अंकिताने शेअर केली.





