Divya Dutta : तो सिनेमा ठरला गेमचेंजर! त्यानंतर 20 सिनेमे केले साईन; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
Divya Dutta : अभिनेत्री दिव्या दत्ताच्या करिअरला वीर झरा या सिनेमाने कलाटणी दिली. त्यानंतर तिला तब्बल 20 सिनेमांच्या अॅाफर्स आल्या होत्या.

Divya Dutta : बॅालिवूडमध्ये आता मुख्य कलाकाराचीच हवा असा काळ राहिलेला नाही. जितके महत्व मुख्य कलाकाराला आहे तितकेच सहाय्यक कलाकाराही आहे. पण यागोदर सहाय्यक कलाकारापेक्षा मुख्य कलाकार चर्चेत असायचे. त्यामुळे सहाय्यक कलारांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागायचा.
बॅालिवूडमध्ये काम करत असलेली अभिनेत्री दिव्या दत्ताने सहाय्यक कलाकार म्हणून तिच्या विविध भूमिकेंमधून वेगवेगळ्या छटा समोर आणल्या आहेत. तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पण अभिनेत्री दिव्या दत्ताचा सुरुवातीचा काळ मोठा कठीण होता. याविषयी सांगताना कोणत्या सिनेमाने तिच्या करिअरला कलाटणी मिळवून दिली. याबाबत तिने सांगितले आहे. त्या एका सिनेमामुळे तिला तब्बल 20 सिनेमांसाठी कास्ट करण्यात आल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. ‘वीर झरा’ या सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्रीने एकाचवेळी 20 सिनेमे साईन केले.
खरंतर दिव्या दत्ताने तिच्या बॉलिवूड प्रवासाला किशोरवयातच सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी तिने ‘इश्क में जीना इश्क में मरना’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली.
या सिनेमानंतर, 1999 च्या ‘शहीद-ए-मोहब्बत बूटा सिंग’ या पंजाबी सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. पण त्यानंतरही तिला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. याच काळात तिला ‘वीर-झारा’ सिनेमात कास्ट करण्यात आले आणि त्यानंतर दिव्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत दिव्याने स्पष्ट केले की, साधारण 2007 साली तिला इतक्या सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या की तिने एकाच वेळी जवळपास 20 चित्रपट साइन केले होते. दिव्या म्हणते, “मला आठवतंय, मी जवळपास 20 चित्रपट स्वीकारले होते, कारण एक काळ असा होता की माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. अचानक मला इतक्या ऑफर्स आल्या की मी त्या सगळ्या स्वीकारल्या.”
अभिनेत्री दिव्या दत्ताने प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबतच्या संभाषणाने काम आणि संधींबद्दलचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असल्याचे सांगितले. तसेच 20 सिनेमांमधून पैसे कमवत राहायचे, हा माझा निर्णय होता. यात खूप काही पणाला लागले होते. पण मी परत गेले आणि ज्या सिनेमांचे चित्रीकरण मी सुरूही केले नव्हते, त्यासाठी मिळालेली साइनिंग अमाऊंट परत केली. तेव्हापासून, मी फक्त तेच काम केले ज्याचा मला आनंद वाटला. हा मी घेतलेला निर्णय होता.”
दिव्या दत्ताचे सिनेमे
अभिनेत्री दिव्या दत्ताला 2017 मध्ये ‘इरादा’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ती ‘भाग मिल्खा भाग’, ‘बदलापूर’ आणि ‘छावा’ यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सिनेमांमध्ये दिसली. अलीकडेच अभिनेत्री ‘चिरैया’ या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या एका वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आहे.
हेही वाचा : Chhaava 2 Film : ‘छावा’चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत





