Karuna Munde : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक उमेदवारी अर्ज करुणा मुंडे यांचाही आहे. त्यांनी काल 6 एप्रिल या दिवशी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही वाचण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. तसेच मुंबईमधून फॅार्म भरण्यासाठी बारामतीला आल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाल्या… Karuna Munde यावेळी बोलताना करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांना पण मला दाखवचं आहे(धनंजय मुंडे). ध…मुंडे बायकोसोबत उभे राहणार की वहिनीसोबत हे पण मला पाहिचे आहे. Karuna Munde : ….म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला; बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया समोर कोणत्या मुद्यावर निवडणुका लढणार याविषयी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, खूप काही मुद्दे आहेत, आपणही बघितलं आहे. बारामती रोलमॅाडेल सांगत होते. पण मला बघून असं काही वाटलं नाही की खूप काही विकास झालेला आहे. तो हे सगळे खूप मुद्दे आहेत. बिजली, शेतकरी, पाणी हाकेंची माघार Karuna Munde बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बारामती पोटनिवडणूक लढण्यासाठी अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. हेही वाचा : Sambhajiraje Chhatrapati : “निवडणुका दर पाच वर्षांनी येतच राहतील, पण…”; बारामती पोटनिवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन