Sanjay Raut : नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना उबाठा पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. कम आॅन किल मी, आहे का हिंमत असे म्हणत थेट ओपन चॅलेंज दिले होते. हे विधान करताना उद्धव ठाकरे यांनी सोबत येताना अॅम्बुलन्स घेऊन असे सुद्धा आव्हान भाजपला दिले होते. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना उत्तर देत नसल्याचे म्हटले होते. यानंतर आता उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या या टीकेचा समाचार घेत त्यांना खोचक टोला लगावला आहे. आम्हाला ते फडणवीस बोलबच्चन म्हणत असतील, तर जगाच्या बोलबच्चन करणाऱ्यांच्या ज्या काही संघटना आहेत, त्यांचे ते अध्यक्ष आहेत, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच पूर्वी त्यांच्याशी संबंध होते, त्यामुळे काही गुणे आले असतील असे म्हणत पलटवार केला आहे. तसेच फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात, असे देखील राऊत म्हणाले. मात्र, मोदी दररोज उघडे पडत आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, असा घणाघातही राऊत यांनी केला आहे. मोदींवर टीकास्त्र ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदी आम्ही केली असे १८ व्या म्हणूनही त्यांच्या वक्तव्यार अजूनही मोदींची दातखिळी बसली असल्याची जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे पक्षातील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पुजा केल्याचा दावा पुण्यातील उबाठाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. अशातच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत, अशी टीका केली आहे. हेही वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटना: इरफान शेखला अखेरचा निरोप; पिंपरी चिंचवडमध्ये झाला दफनविधी