कर्तव्य पार पाडल्याबद्दल मोदींचे अभिनंदन – संजय राऊत

मुंबई – आज (दि. 5) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे.
दरम्यान, या घोषणेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधना आहे. राऊत म्हणाले कि, “अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं कर्तव्यच होतं”. असं राऊत बोलले.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं सुद्धा यावेळी म्हणाले.





