“देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात….”; अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali’s post : मराठी सिनेमांत आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिने आजवर अनेक दर्जेदार सिनेमांमधून भूमिका साकारत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. यामुळे ती चर्चेत येते. आता नुकत्याच इंन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे.
तिने भूमिका केलेल्या फुलवंती या सिनेमाला ११ अॅाक्टोबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे प्राजक्ताने पोस्ट शेअर करत या सिनेमातील साकारलेल्या व्यक्तीरेखेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यंदाचे जवळपास सर्व पुरस्कार जीनं मिळवून दिले, त्या “फुलवंती”च्या प्रदर्शनाला आज १ वर्ष पुर्ण झालं… देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात आली… ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी तो नक्की पहा. प्राईम व्हिडीओ आणि zee5 वर चित्रपट उपलब्ध आहे. सौंदर्य आणि कलेची अनभिषिक्त सम्राज्ञी फुलवंती तर दुसरीकडे विद्याविभूषित प्रकांडपंडित शास्त्रीबुवा… यांच्यामधील संघर्षाला १ वर्ष पूर्ण झालं. वर्षपूर्ती ‘फुलवंती’ चित्रपटाची” अशी पोस्ट शेअर करत प्राजक्ताने प्रेम व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील प्राजक्ताच्या व्यक्तिरेखेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. याच सिनेमातील मदनमंजिरी हे गाणं हिट ठरले. या सिनेमात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले होते. तर स्नेहल तरडेंनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, क्षितिश दाते, सुखदा खांडकेकर, दीप्ती लेले अशी मोठी स्टारकास्ट होती.
हेही वाचा : १० अन् ११ अॅाक्टोबरचे ट्वीट चर्चेत! महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितली लाख मोलाची गोष्ट म्हणाले…





