ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलं मेट्रो ट्रायल रन

Thane Metro Trail Run | ठाणे शहरात प्रवाशांच्या सेवेत पहिली मेट्रोसेवा लवकरचं धावणार आहे. आज सकाळी गायमुख येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ही ट्रायल रन पार पडले.
ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रो मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी घोडबंदर मार्गावरील चार मेट्रो स्थानकांची आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रन झाला आहे.
दरम्यान, हा मेट्रो मार्ग चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) मधील तपासणी टप्पा-१ मधील चार प्राधान्य स्थानके असून यात घोडबंदर रोडवरील, गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांचं समावेश आहे. सध्या ठाणे मेट्रो प्रकल्प ४ (वडाळा-घाटकोपर) आणि ४ – अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाची कामं सुरू आहेत. आजची चाचणी घोडबंदर येथील गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शनपर्यंत झाली आहे. Thane Metro Trail Run |
कोणत्या स्थानकांचा असणार समावेश?
ठाणे मेट्रो 4 ही ३२ किलोमीटर तर ४ अ ही २.७ किलोमीटर मार्गावर धावेल. दोन्ही मार्गिका मिळून ३२ स्टेशन असतील. यामध्ये कॅडबरी, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवानिवाडा आणि गायमुखया स्थानकांचा समावेश आहे.
दरम्यान, ठाणेकरांच्या वाहतुकीसाठी हा टप्पा महत्वाचा मानला जातो. मेट्रो सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूककोंडीला मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. ठाणेकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून लवकरच मेट्रोसेवा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा:
४ महिन्यांचा संघर्ष संपला! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्कची भेट ; ‘तो’ फोटो व्हायरल





