Trailer : थालापती विजयचा GOAT चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी होणार सज्ज

GOAT Hindi Trailer | दाक्षिणात्य अभिनेता थालापती विजय त्याच्या अॅक्शन सीनमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या चित्रपटांबाबत चाहते देखील आतुर असतात. यानंतर आता थालापती विजयचा ‘गोट: ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा थालापती विजयचा चित्रपट सप्टेंबरमध्ये जगभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टारची लोकप्रियता लक्षात घेता, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइमचे आगाऊ बुकिंग त्याच्या रिलीजच्या एक महिना आधी सुरू करण्यात आले होते. मात्र, चित्रपटाचे हे आगाऊ बुकिंग भारतात नसून यूके (युनायटेड किंगडम) मध्ये सुरू झाले आहे.
मीनाक्षी चौधरी, जयराम, स्नेहा, लैला, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, अजमल अमीर, मनोबाला, वैभव, प्रेमगी, अजय राज आणि अरविंद आकाश यांसारखे कलाकार व्यंकट प्रभू दिग्दर्शित द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईममध्ये दिसत आहेत. त्याची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळते. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, थालापती विजय शेवटचा लिओ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि नेटफ्लिक्सवरही त्याची चर्चा झाली.
हेही वाचा:
राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा ; ‘या’ भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी





