‘थायलंड-कंबोडिया तात्काळ युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्यास तयार’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Thailand Cambodia Border Conflict। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, थायलंड आणि कंबोडियाचे नेते लवकरच परस्पर युद्धबंदीसाठी भेटतील” अशी मोठी घोषणा केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सीमेवर हिंसक संघर्ष सुरू आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे १.३ लाख लोक बेघर झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची मोठी घोषणा Thailand Cambodia Border Conflict।
राष्ट्रपती ट्रम्प सध्या स्कॉटलंडच्या दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी दोघांनाही इशारा दिला की,”जर युद्ध सुरूच राहिले तर अमेरिका त्यांच्यासोबत व्यापार करार करणार नाही.”
पुढे ट्रम्प यांनी लिहिले की, “दोन्ही देशांना तात्काळ शांतता हवी आहे आणि ते समेटासाठी तयार आहेत. दोन्ही नेते लवकरच युद्धबंदीसाठी एकत्र काम करतील.” मात्र व्हाईट हाऊस किंवा दोन्ही देशांच्या दूतावासांनी अद्याप या संभाषणाची पुष्टी केलेली नाही.
मलेशियाच्या पंतप्रधानांनीही युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला
आसियानचे अध्यक्ष आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनीही संघर्ष थांबवण्यासाठी युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला आहे. कंबोडियाने या प्रस्तावाला उघडपणे पाठिंबा दिला आहे, तर थायलंडने म्हटले आहे की त्यांनी ‘तत्त्वतः तो स्वीकारला आहे’.
दोन्ही देशांमधील वाद काय आहे? Thailand Cambodia Border Conflict।
८१७ किमी लांबीच्या थायलंड-कंबोडिया सीमेच्या अनेक भागांवर दीर्घकाळ वाद आहे. विशेषतः प्रेह विहार आणि ता मोन थॉम सारख्या ११ व्या शतकातील प्राचीन हिंदू मंदिरांबद्दल, दोन्ही देशांचा दावा आहे की हे त्यांच्या हद्दीत आहेत. १९६२ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) प्रेह विहार मंदिराला कंबोडियाचा भाग मानले, परंतु थायलंडने हा निर्णय पूर्णपणे स्वीकारला नाही. २००८ मध्ये, जेव्हा कंबोडियाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात या मंदिराचा समावेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाद आणखी तीव्र झाला.





