Pimpri : थाय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

चिंचवडगाव : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने २० वी पिंपरी-चिंचवड थाय बॉक्सिंग स्पर्धा पिंपळे सौदागर येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडली. शहरातील थाय बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धांमध्ये क्रीडांगणावर एकापेक्षा एक दमदार सामने पाहायला मिळाले.
फाईट इव्हेंट व म्युझिकल फॉर्म अशा दोन प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सुमारे १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, चपळाई व क्रीडाभाव दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम चॅम्पियनशिप चषक – लेजंड मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी, द्वितीय – मौर्यन्स मार्शल आर्ट्स, तृतीय – शार्प स्पोर्ट्स फाउंडेशन, चतुर्थ – गोल्डन मार्शल आर्ट, पाचवे – वाईल्ड फीट अकॅडमी. अमित शर्मा, आकाश ओतारी, निखिल पवार, आफताब शिकलगार, अरुण घोडेकर, मनोज धावारे, सुमित कांबळे, आयेशा शेख, हेतल शहा, अनय वैद्य, शिवराज निंबाळकर यांनी काटेकोर व पारदर्शकपणे स्पर्धेचे परीक्षण केले. या भव्य स्पर्धेचे आयोजन शार्प कराटे ॲन्ड किक बॉक्सिंग स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी केले होते, तर नियोजन जमीर शिकलगार यांनी केले.
स्पर्धेत यशस्वी ठरलेले खेळाडू आता राज्यस्तरीय आव्हानाला सामोरे जाणार असून, लातूर येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य थाय बॉक्सिंग स्पर्धेत आपले कौशल्य सादर करतील. मनविसचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत महादेव डांगे, शहराध्यक्ष अनिकेत प्रभु आदी मान्यवर उपस्थित होते.





