Thackeray Vijay Sabha Live Updates| आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी – उद्धव ठाकरे

Thackeray Vijay Sabha Live Updates | संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा ठाकरे बंधुंचा विजयी मेळावा आज होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. ती घडामोड ठाकरेबंधूंचे बहुचर्चित मनोमिलन घडवणारी ठरणार का, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी…उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला
इकडे शेतकऱ्याला शेती करायला बैल मिळेना. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घानामध्ये पुरस्कार घेत आहेत – उद्धव ठाकरे
… तर आम्ही गुंडगिरी करूच – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी अफवा उठवली. पण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कडवट हिंदुत्व आहे. जर मराठीसाठी आम्ही आंदोलन करत असू आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही आहोत गुंड. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच – उद्धव ठाकरे
“आम्हा दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, आता…”; उद्धव ठाकरेंचा फडणविसांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत
आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी.- उद्धव ठाकरे
अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे
आज मोर्चा निघायालाच पाहिजे होता. मोर्चामध्ये मराठीच्या एकतेचं चित्र दिसले असते. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे
“बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं”; राज ठाकरेंचा टोला
राज-उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल
विजयी मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दाखल झाले आहेत.
टाळ्या शिट्या अन् जल्लोष….! ‘ठाकरे बंधूं’ची ग्रॅन्ड एन्ट्री! राज ठाकरेंच्या लूकमध्ये राजकीय संदेश?
दोन्ही ठाकरे वरळी डोम येथे दाखल
उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे देखील मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल झाले आहेत.
सुशील केडियाच्या ऑफिसवर मनसैनिकांचा हल्ला
मराठी भाषेवरून वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सुशील केडियाच्या ऑफिसवर मनसैनिकांनी हल्ला केला आहे. मेळावा सुरू होण्यापूर्वी मनसे स्टाइल दणका देण्यात आला आहे. केडियाने राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं. सुशील केडिया मुंबईतला एक व्यावसायिक आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते वरळी डोम येथे पोहचतील. तर शर्मिला ठाकरे या वरळी डोममध्ये दाखल झाल्या आहेत.
वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी झाली आहे. बऱ्याच मनसे, शिवसेनेच्या नेत्यांना आतमध्ये प्रवेश करणं कठिण झाले आहे. मोठ्या संख्येने महिला देखील यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
तेजस्विनी पंडित सहभागी
मराठी कलाकारांनीही या मेळाव्याला हजेरी लावली आहे. यात तेजस्विनी पंडित, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा समावेश आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित सहभागी झाली आहे. जे कलाकार या मेळाव्यासाठी येणार नाहीत, त्यांच्याविषयी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नाराजी व्यक्त केली आहे.
सोहळ्यात फक्त चार जणांची भाषणं
वरळी डोममध्ये होऊ घातलेल्या या सोहळ्यात फक्त चार जणांची भाषणं होणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाश रेड्डी यांचा समावेश आहे. व्यासपीठावर फक्त दोन खुर्च्या असतील. त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी असतील.
संदीप देशपांडे टी-शर्ट
मेळ्यात कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह नको असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज घातलेल्या टी-शर्टने लक्ष वेधले आहे. देशपांडे यांनी परिधान केलेल्या हा टी शर्ट मराठीचा असल्याचे दिसत आहे. टी-शर्टवर बाराखडी लिहिलेली आहे. तसेच ‘आवाज मराठी’चा असे देखील लिहिलेलं दिसत आहे.





