Uddhav Thackeray | भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसवर सडकून केली. काँग्रेस हा भाऊ-बहिणीच्या नात्याला गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष आहे, असे वर्णन त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेधही करण्यात येत आहे. या विधानावरून आता ठाकरे गटानेही मुनगंटीवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नेमकं काय ?
‘भाजपा हा एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष आहे. मोदी ज्या मंचावर होते त्याच मंचावरून चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यासंदर्भात अत्यंत घाणेरडे भाष्य करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे.’
मोदी यांच्यासमोर हे घडले, पण एरवी विरोधकांवर घसरणारे मोदी त्यांच्या उमेदवारांच्या बेताल बोलण्यावर गप्प बसले, जसे ते स्वपक्षाच्या निवडणूक रोखे भ्रष्टाचारावर तोंडास पट्टी बांधून गप्प बसले आहेत. मोदी व त्यांचे लोक देश बरबाद करीत आहेत व या बरबादीस रोखण्याचे कर्तव्य महाविकास आघाडीस पार पाडायचे आहे”, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.
हे वाचलं का ?